गोंदिया-जिल्ह्यात मागील ३ दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सध्या ढगाळ वातावरण असून पावसाची अधुनमधून रिमझिम सुरू आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
गोंदियात पावसाने धानपिकाचे मोठे नुकसान; शेतकरी संकटात - गोंदियात पावसाने धानपीकाचे मोठे नुकसान बातमी
धानपीक सध्या काढणीली आले आहे. काही शेतकऱ्यांनी धावपीक काढून ठेवले आहे. मात्र, मागील तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. अधुनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धानपीक वाचवण्यासाठी तारांबळ उडत आहे.

गोंदियात पावसाने धानपिकाचे मोठे नुकसान
गोंदियात पावसाने धानपिकाचे मोठे नुकसान
हेही वाचा-मैत्रिणीने बोलावले असल्याचा बहाणा करत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
धानपिक सध्या काढणीली आले आहे. काही शेतकऱ्यांनी धावपीक काढून ठेवले आहे. मात्र, मागील तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. अधुनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धानपीक वाचवण्यासाठी तारांबळ उडत आहे. काही शेतकऱ्यांचे काढलेले धानपीक भिजले आहे. धानपीकासोबतच ईतर पिकाचेही नुकसान झाले आहे. शासनाने याचा पंचनामा करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.