महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियात पुन्हा १० भातपिकाच्या गंजी जाळल्या, आतापर्यंत ५ वी घटना - गोंदियात पुन्हा १० भातपिकाच्या गंजी जाळल्या

भातपिकाच्या गंजी जाळण्याची ही आतापर्यंतची पाचवी घटना आहे. यामध्ये शेकडो भातपिकाच्या गंजी जाळण्यात आल्या आहेत. यामध्ये देवरी तालुक्यात गेल्या ५ दिवसात ७५ गंज्या जाळण्यात आल्या आहेत. मात्र, गंजी जाळणाऱ्या आरोपीचा अद्याप शोध लागलेला नाही.

rice crop burned by unknown person
भातपिकाच्या गंजी जाळल्या

By

Published : Dec 7, 2019, 6:38 PM IST

गोंदिया - कामठा गावातील शेतशिवारात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा १० च्या वर भातपिकाच्या गंजी जाळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही आतापर्यंतची ५ वी घटना आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. तसेच याप्रकरणी रावणवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गोंदियात पुन्हा १० भातपिकाच्या गंजी जाळल्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या शेतातील भातपिकाच्या गंजी वाचवण्यासाठी शेतकरी रात्री शेतात पहारा देत आहेत. विधानसभेचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी शुक्रवारी रात्री जाळण्यात आलेल्या भातपिकाच्या गंजींची पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत भातपिकाच्या गंजी जळालेल्या शेतकऱ्याला २० हजार रुपये मदत करण्यात येत आहे. मात्र, ही मदत तुटपुंजी असून आहे. त्यामुळे योग्य पंचनामे करून योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

भातपिकाच्या गंजी जाळण्याची ही आतापर्यंतची पाचवी घटना आहे. यामध्ये शेकडो भातपिकाच्या गंजी जाळण्यात आल्या आहेत. यामध्ये देवरी तालुक्यात गेल्या ५ दिवसात ७५ गंज्या जाळण्यात आल्या आहेत. मात्र, गंजी जाळणाऱ्या आरोपीचा अद्याप शोध लागलेला नाही.

आतापर्यंत 'या' गावात जाळल्या भातपिकाच्या गंजी -

ABOUT THE AUTHOR

...view details