गोंदिया - कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील प्राध्यापकांची भरती रखडलेली होती. मात्र, आता हायकवार कमेटीने प्राध्यापक भरतीला मान्यता दिली असून आता ती फाईल वित्त विभागाडे गेली आहे. तिला दोन-तीन दिवसांत मंजुरी मिळेल. त्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल, तर तासिका प्राध्यापकाच्या मानधनात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ऊदय सामंत यांनी दिली.
हेही वाचा -रेल्वे प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला अटक
विद्यापीठाच्या परीक्षा रद्द होणार नसून त्या ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती देखील सामंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार पत्रपरिषदेत सांगितली.
संभाजी राजेंना भेटण्यासाठी वेळ न देणे हा जनतेचा अपमान