गोंदिया -विजयादशमीला रावणाचे दहन केले जाते. मात्र गोंदिया जिल्ह्यातील आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त असलेल्या कलसावटोला येथे विजयादशमीला नाचत गाजत रावणाची पूजा करण्यात आली आहे. याशिवाय रावणाच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी विशेष होम-हवन व शांती यज्ञही करण्यात आले. विजयादशमी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय. रामराज्याचा रावणराज्यावरचा विजय. प्रभू रामाने रावणाचा शेवट केला तो दिव्य दिवस. रावणाने सीतेचे अहंकारातून हरण केले याच अहंकारी रावणाचा दशमीला रामाने वध केला. म्हणून संपूर्ण भारतभर विजयादशमीला (दसऱ्याला) रावणरूपी पुतळ्याचे दहन करत दसरा सन मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. कलसावटोला येथील आदिवासी बांधव रावणाला आपले कुल दैवत माणून रावणाच्या फोटोची पूजा अर्चना करून वाजत गाजत पारंपरिक नृत्य सादर करून रावणाला श्रद्धांजली अर्पण केली.
विजयादशमीला 'या' गावात रावणाचे दहन न करता पारंपारिक पद्धतीने केली जाते पूजा - रावणाची येथे केली जाते पूजा
रावणाने सीतेचे अहंकारातून हरण केले याच अहंकारी रावणाचा दशमीला रामाने वध केला. म्हणून संपूर्ण भारतभर विजयादशमीला (दसऱ्याला) रावणरूपी पुतळ्याचे दहन करत दसरा सन मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. कलसावटोला येथील आदिवासी बांधव रावणाला आपले कुल दैवत माणून रावणाच्या फोटोची पूजा अर्चना करून वाजत गाजत पारंपरिक नृत्य सादर करून रावणाला श्रद्धांजली अर्पण केली.
आदिवासी लोकांची ही पूर्वीची संस्कृती आहे. मात्र अलीकडे काही समाजाच्या लोकांनी तसेच दुसऱ्या संस्कृतीच्या लोकांनी या समजावर दडपण आणून तसेच त्यांची दिशाभूल केली असल्याची भावनाही आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे. या संस्कृतीला संपण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून आमची संस्कृती आमचे लोक विसरले आहेत. आम्ही आदिवासी मूर्ती पूजन करत नाही. आम्ही निसर्गाची पूजा करत असतो आणि आमचे पूर्वज म्हणजे रावण, म्हसासुर हे आहेत. परंतु अलीकडे आमचे विरोधी समाजाने आमच्या पूर्वजांचे पुतळ्यांचे विटंबना करून आमच्या समाजाची दिशा भूल केली आहे, अशी भावनाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वास्तविक पाहिले तर रावण, म्हसासुर, तंटयाबिल हे आमचे पूर्वज आहेत. तसेच पूर्वीचे राजे, महाराजे, सम्राट आहेत. आम्ही आदिवासी त्यांची पूजा अर्चना करतो. आम्ही आमच्या समाजाला हे सांगत असतो कि आपल्या पूर्वजांची जी संस्कृती आहे, ति विसरू नका. मात्र आमचे आदिवासी लोक दुसऱ्या समाजाच्या दबावामध्ये असल्यामुळे आमचे लोक आपली संस्कृती विसरले आहेत, अशी प्रतिक्रियाही यावेळी आदिवासी बांधवांनी दिली आहे.
हेही वाचा -विजयादशमीनिमित्त जी शस्त्रं काढली जातात ती कोणासाठी कशासाठी काढली जातात हे कळेल - संजय राऊत