गोंदिया - रामनगर पररिसरात घरफोडी करून तब्बल 4 लाख 97 हजार 411 रुपयांच्या रोख रकमेसह मुद्येमाल लंपास केल्याची घटना घडली. यासंबंधीत 3 चोरट्यांच्या टोळीला गजाआड करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणातील आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करून विचारपूस केली असता चोरट्यांनी 3 ठिकाणी घरफोडी केल्याचे कबुल केले आहे.
चार लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला रामनगर पोलिसांनी केले गजाआड हेही वाचा - ठाण्यात नोकराने मारला 39 लाखांचा डल्ला, झारखंडमधून अटक
रामनगर पोलीस ठाण्याअंतर्गत 12 आक्टोबर व 18 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या 3 घरफोड्यांमध्ये अशोक बुधराम देशमुख मरारटोली यांच्या घरातून 2 लाख 82 हजार, 18 नोव्हेंबरला डीलचंद शादीराम पारधी यांच्या घरातून 2 लाख 11 हजाराचा मुद्येमाल लंपास केला होता. पोलीस अभिलेखातील गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली असता शंकर उर्फ गुरु राजाराम पटले (रा. संजयनगर, गोंदिया), विकी राधेश्याम सुर्यवंशी (रा. मुसलमान टोली, तिरोडा) व अविनाश सुरेंद्र मते (मरारटोली, गोंदिया) यांचा समावेश असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तपास सुरू करून त्यापैकी एकाला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी येथून, उर्वरीत दोघांना गोंदिया व तिरोडा येथून ताब्यात घेण्यात आले.
आरोपींची विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबुल केला आहे. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत 3 गुन्हे केले असून मुद्येमाल आपल्याकडे असल्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून 4 लाख 97 हजार 411 रुपयाचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच आरोपींना रामनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हेही वाचा - अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; नागभीड पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल