महाराष्ट्र

maharashtra

गोंदियाला गारपिटीसह अवकाळी पावसाने झोडपले, शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाचे प्रचंड नुकसान

By

Published : Feb 24, 2020, 10:58 PM IST

गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पासामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या पावसामुळे शहरात पाणी तुंबल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला.

rains-caused-severe-damage-to-the-farmers
गोंदियात गारपिटीसह अवकाळी पावसाने झोडपले, शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाचे प्रचंड नुकसान

गोंदिया -जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसाचा फटका पिकांना बसला. वादळी वारे आणि विजांचा कडकडाट सोबत घेऊन आलेल्या पावसाने गोंदीयातील नागरिकांना चांगलेच झोडपले. संध्याकाळी आर्ध्या तासाच्या अवधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरात पाणी तुंबल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला.

गोंदियात गारपिटीसह अवकाळी पावसाने झोडपले, शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाचे प्रचंड नुकसान

वादळी वारे आणि गारांसह गोंदियात सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. अर्जुनी मोरगाव, तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान, गव्हाचे मोठे नुकसान झाले. ज्वारीलाही त्याचा फटका बसला. अनेक ठिकाणी झाडे कोसळून तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. ढगांचा गडगडाट आणि विजांसह आलेल्या पावसाने जिल्ह्यातील आंबा आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले. अनेक ठिकाणी झाडेही कोसळली. तर अनेक घरांची पडझड झाल्याचीही माहिती आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details