महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियात रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालाला अटक, ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त

रेल्वे सुरक्षा दलाच्या चमुला ई- तिकीटांच्या काळ्याबाजाराची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा बलाचे प्रभारी निरीक्षक नंदबहादूर, उपनिरीक्षक विनेक मेश्राम आणि त्यांच्या चमूने धाड टाकली

गोंदियात रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालाला अटक, ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त

By

Published : May 16, 2019, 5:00 PM IST

गोंदिया - जिल्ह्यात सडक अर्जुनी येथे रेल्वेच्या ई-तिकीटांचा अवैध व्यवसाय करणाऱ्या दलालास रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने अटक केली. त्याच्याकडून तब्बल ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दीपक उर्फ पंकज अवेंद्रसिंग (२८) असे या दलालाचे नाव आहे.

रेल्वे सुरक्षा दलाच्या चमुला ई- तिकीटांच्या काळ्याबाजाराची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा बलाचे प्रभारी निरीक्षक नंदबहादूर, उपनिरीक्षक विनेक मेश्राम आणि त्यांच्या चमूने धाड टाकली. सडक-अर्जुनीच्या पवन ऑनलाईन सर्विस, रेल्वे रिझर्वेशन सेंटरवर दीपकची याबाबत चौकशी केल्यानंतर त्याच्या बोगस पर्सनल आयडीने रेल्वेची अवैध पद्धतीने तिकीट बनवित असल्याचे स्पष्ट झाले.

गोंदियात रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालाला अटक

त्याच्या दुकानात असलेल्या लॅपटॉपची तपासणीही करण्यात आली. यामध्ये १५ ई-तिकीट आढळल्या. दीपक आरआरसीटीसीचा अधिकृत ऐजंट नसतांनाही अधिक पैसा कमविण्याच्या नादात आरआरसीटीसीच्या बोगस नावाने आयडी बनवून ग्राहकांची तिकीट बनवत असतो. त्याच्यावर अवैध व्यवसाय आणि रेल्वे अधिनियम कलम १४३ अंतर्गत कारवाई करण्यात आली. दस्तावेजाची तपासणी केल्यावर १५ ई तात्काळ तिकीटाची किंमत २२ हजार ४१४ रूपये, २० हजार रूपये किमतीचा लॅपटॉप, १० हजार रूपये किमतीचा एक प्रिंटर दीड हजार रूपये किंमतीचा राऊटर, ५ हजार रूपये किमतीचा मोबाईल आणि ८७० रूपये रोख, असा ५८ हजार ९१४ रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details