गोंदिया - शहर आणि ग्रामीण भागातून मोटारसायकल आणि सायकल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. रेल्वे स्टेशन, शाळा, कॉलेज अशा ठिकाणांहून सायकल चोरीला जात असतात. दररोज कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत आहेत. या आधी रेल्वे पोलिसांनी मोटरसायकल चोरांना अटक केली होती. मात्र, सायकल चोरटे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. गोंदिया पोलिसांना सायकल चोरीच्या प्रकरणाचा तपास करताना एक सायकल चोर सापडला. अधिक तपास करताना रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी 3 सायल चोरांना अटक केली. त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या 1 लाख 76 हजार 300 रुपये किमतीच्या सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
सायकल चोरीचे रॅकेट रेल्वे पोलिसांनी केले गजाआड, पावणे दोन लाखाच्या सायकल जप्त - गोंदीया बातमी
गोंदिया रेल्वे पोलिसांनी सायकड चोराना अटक केली. त्याच्याकडू १ लाख ७६ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यामध्ये आरोपी देवेंद्र उर्फ देवा प्रीतम निर्विकार (वय 26), दिलीप अनंतराव वरखडे (वय 26) हे (दोघे राहणार कटंगी) कला व भवरलाल साहेबलाल दमाहे (वय 30, राहणार बरबस पुरा) हे तीन आरोपी असून रेल्वे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. 26 ऑगस्टला मेघराज जीवनलाल राम ढाले (राहणार आंभोरा) हे आपल्या मुलीला रेल्वेस्थानकावर सोडण्याकरता आले होते. त्यांनी लेडीबर्ड कंपनीची सायकल रेल्वे बुकिंग कार्यालय समोर ठेवली होती. ते मुलीला सोडून परत आले, तर त्या ठिकाणी सायकल नव्हती. त्यांनी शोधाशोध केली असता, सायकल मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील फुटेजची तपासणी केली असता त्यामध्ये मिरगराज यांची सायकल दोघे चोरुन घेऊन जात असल्याचे दिसले. त्यावरून त्या दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी सायकल चोरीची कबुली दिली. रेल्वे पोलिसांनी या दोघा आरोपींना ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. आरोपींनी भवरलाल दमाहे हा देखील आपल्यासोबत असल्याची कबुली दिली. या तिघांकडून विविध कंपन्यांचे महागडे साहित्य जप्त करण्यात आले आहे.