गोंदिया -नागरिकांना रेल्वेचे अनारक्षित तिकीट घेण्याकरता अनेक तास रांगेत उभे राहावे लागते. मात्र, लांबच लांब रांगेमुळे कधी कधी तिकीट न मिळाल्याने नागरिक प्रवास करू शकत नाहीत. त्यामुळे नागरिकांची महत्वाची कामे खोळंबतात. या अडचणी वर मात करत भारतीय रेल्वेने यु टी एस (UTS ) अॅप सुरु केले आहे. या सुविधेमुळे रेल्वेचे पेपर लेस तिकीट मिळणार आहे.
आता अनारक्षित रेल्वे तिकीट मिळणार UTS अॅपवर - रेल्वे
गोंदिया रेल्वे स्टेशनवर रेल्वेच्या माध्यमातून यु टी एस (UTS ) अॅपची माहिती रेल्वे कर्मचारी देतात. या अॅपसाठी तुमच्या कडे अँड्रॉईड मोबाईल असणे आवश्यक आहे.
गोंदिया रेल्वे स्टेशनवर रेल्वेच्या माध्यमातून यु टी एस (UTS ) अॅपची माहिती रेल्वे कर्मचारी देतात. या अॅपसाठी तुमच्या कडे अँड्रॉईड मोबाईल असणे आवश्यक आहे. आपल्या अँड्रॉईड मोबाईल मध्ये प्ले स्टोर द्वारे हे अॅप घ्यावे लागते. यानंतर आपल्या मोबाईल नंबर सह आपले नाव व जन्म तारीख याचा समावेश या अॅपमध्ये करावा लागतो. आपले खाते तयार झाले कि आपल्याला काही क्षणातच जिथे जायचे आहे, त्या ठिकाणचे अनारक्षित तिकीट आपल्या मोबाईल वर मिळणार आहे. या अॅपमुळे आपल्याला लांबच लांब रांगेत ऊभे राहायची गरज नाही. आपला वेळ या अॅपमुळे वाचणार आहे.
या अॅपने अनारक्षित तिकीट घेता येणार असुन लहान मुलांचे हि तिकीट या अॅपने घेता येते. प्लॅटफॉर्म तिकीट मासिक पास पण या अॅपने बनवता येणार आहे. कधी तिकीट काढले व अचानक जाणे रद्द झाले तर या अॅप द्वारे ते हि रद्द करता येते. या अॅप द्वारे तिकीट काढले तर ५ टक्के कैशबैक मिळतो. या कैशबैक द्वारे जेव्हा तिकीट काढत असताना आपण रेल्वे स्टेशन पासून ५ किलो मीटरच्या आत असावे ही खबरदारी घ्यावी किवा रेल्वे रूळापासुन २५ मीटर दूर असावे. तेव्हाच हे अॅप तिकीट बनवण्याचे काम करणार आहे.