गोंदिया -जिल्ह्यात २१ डिसेंबरला होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ( Local Body Elections 2021 ) निवडणुकांच्या प्रचार तोफा आज (रविवारी) थंडावल्या आहेत. अनेक गावात आज (रविवारी) प्रचार रॅली ( Promotion Rally ) एकमेकांसमोर येऊन धडकली. यावेळी उमेदवारांनी देखील एकमेकांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. गोंदियाच्या फुलचूर जिल्हा परिषद ( Phulchur Zilla Parishad ) क्षेत्रात देखील काहीशी अशीच जुगलबंदी भाजपा आणि राष्ट्रवादी ( BJP and NCP Candidates ) काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये पाहायला मिळाली.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या ४३ जागांवर तर, ८ पंचायत समितीच्या ८६ जागांवर आणि ३ नगर पंचायतीच्या ४५ जागांसाठी मतदान होणार आहे. ८ लाख ३८ हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क २१ डिसेंबरला बजावणार आहेत. यासाठी १३४५ मतदान केंद्रावर मतदान होणार आहेत. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ४३ जागांसाठी २४३ उमदेवार तर पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी ३८८ उमदेवार, नगर पंचयतीच्या ४५ जागांसाठी २९३ उमदेवार रिंगणात उभे आहेत. आज जरी प्रचार तोफ थंडवली असली तरी उमदेवार उद्यापासून (सोमवारी) छुप्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहचार आहेत. गोंदियात जिल्ह्यात आतापर्यंत भारतीय जनता पक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सेनेच्या उमेदवारांसाठी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, तर राष्ट्रवादी उमेदवारांसाठी प्रफुल्ल पटेल यांच्यासह इतरही पक्षाचे नेते प्रचारासाठी उतरल्याचे पाहायला मिळाले. येत्या १९ जानेवारीला निकाल लागणार आहे. यावरुन पुढील चित्र स्पष्ट होईल.
- एकूण मतदार आणि मतदान