गोंदिया - जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावर निर्माण झाले आहे. आज सकाळी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुन्हा सायंकाळी पावसाने तुरळक ठीकाणी पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 2.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली आहे.
हवामान खात्याने 18 ते 19 मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. अरबी समुद्र आणि दक्षिणेकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे एकत्र येणार असल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार गोंदियात पावसाला सुरुवात झाली. व वातावरणात गारवा निर्माण झाला. शहरातील काही भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या असून काही भागात मध्यम व तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. उन्हाळ्याची चाहूल लागत असताना झालेल्या पावसाने गारवा निर्माण झाला. मात्र, रब्बी हंगामातील काही पीके शेतात काढून टाकलेली असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
वातावरण बदलाने रब्बी पिके धोक्यात-