महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाघ नदीत बुडून तरूणाचा मृत्यू, कावडीत भरत होता पाणी - वाघ नदी गोंदीया

कावडसाठी पाणी भरणार्‍या युवकाचा वाघ नदीत बुडून मृत्यू झाला. प्रमोद वंजारी (वय 36 वर्षे. रा. छोटा रजेगाव) असे बुडून मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

gondia
gondia

By

Published : Aug 17, 2021, 3:52 AM IST

गोंदिया - कावडसाठी पाणी भरणार्‍या युवकाचा वाघ नदीत बुडून मृत्यू झाला. प्रमोद वंजारी (वय 36 वर्षे. रा. छोटा रजेगाव) असे बुडून मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

कावडमध्ये पाणी भरण्यासाठी तो वाघ नदीच्या पात्रात गेला होता. यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो नदीत पडला. याची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. शोध व बचाव पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र या दरम्यान त्या युवकाचा मृत झाला. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ही घटना सोमवारी (16 ऑगस्ट) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.

कावडीत पाणी भरण्यासाठी गेला होता नदीत

श्रावण महिन्याच्या सोमवारी मोठ्या संख्येने कावड यात्रेकरू महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवरील रजेगाव येथे वाघ नदी परिसरात येतात. तेथे कावड आणून विविध शिव मंदिरात अभिषेक करतात. या दरम्यान आज प्रमोद वंजारी हा कावड आणण्यास गेला होता. कावडसाठी पाणी भरत असताना त्याचा पाय घसरला आणि तो नदीत पडला.

दुपारी सापडला मृतदेह

या घटनेची माहिती रावणवाडी पोलीस निरीक्षकांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी पोहचून शोध अभियान सुरू केले. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम सुद्धा पोहचली. आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या शोध व बचाव पथकाने स्थानिक गोताखोरांच्या मदतीने प्रमोदचा शोध घेतला. 2 वाजताच्या सुमारास बचाव पथक व गोताखोरांना प्रमोदचा मृतदेह सापडला.

हेही वाचा -धक्कादायक! नाशिकमधील प्रांताधिकाऱ्याची नियत घसरली, तलाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details