महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रफुल्ल पटेल यांची पंतप्रधान सहाय्यता निधीस १ कोटींची मदत - प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान सहायता निधीत १ कोटी केला जमा

माजी केंद्रीय मंत्री व खासादर प्रफुल पटेल यांनी कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या संकटात लढा देण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी १ कोटी रूपयांची आर्थिक मदतची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांपुर्वीच पटेल यांनी आपल्या स्थानिक विकास खासदार निधीतून गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याला प्रत्येकी २५ लाख रूपयांचा निधी दिला होता.

Prafull Patel
प्रफुल्ल पटेल

By

Published : Apr 2, 2020, 4:27 PM IST

गोंदिया - देश आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. यामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. परिणामी सर्व उद्योग धंदे आणि बाजारपेठा पूर्णपणे ठप्प आहेत. त्यामुळे देशात संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. देश व राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाशी केंद्र व राज्य सरकार सक्षमपणे लढा देत आहे.

डॉक्टर्स, पोलीस, अधिकारी, कर्मचारी सुध्दा दिवस-रात्र झटत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती विरूध्द शासन आणि प्रशासन सक्षमपणे सामना करीत आहे. कोरोना विरूध्दची लढाई अधिक तीव्रपणे लढता यावी यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी १ कोटी रूपयांचा निधी पंतप्रधान मदत निधीत जमा करण्याची घोषणा केली आहे. तसेच यासंबंधीचे पत्र सुध्दा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

देश व राज्यात निर्माण झालेल्या स्थितीत सरकारच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याची गरज असुन यासाठी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील अदानी विद्युत प्रकल्प, सनफलेग, अशोक ले लॅन्डसारख्या उद्योगजकांनी सुध्दा पुढे येउन मदत करावी असे पटेल यांनी म्हटले आहे. लॉकडाउनच्या कालावधीत नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच राहुन शासनाच्या दिशा निर्देशांचे पालन करावे असे त्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details