गोंदिया- लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी असणार आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात कार्यकत्यांच्या बैठकीवेळी ते बोलत होते.
विधानसभा निवडणूकीसाठीही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी- प्रफुल्ल पटेल - गोंदिया
लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी असणार आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.
येत्या २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे येत्या २३ तारखेलाच कळणार आहे. तर लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणूकची राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
यावेळी पटेल म्हणाले, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होणार आहे. गोंदिया-भंडारामध्ये ७ विधानसभा जागा आहेत. त्या सातही विधानसभा जागेसाठी आमची आघाडी होणार आहे. त्यामुळे आमचेच उमेदवार निवडून येणार, असा आत्मविश्वासही पटेल यांनी व्यक्त केला.