गोंदिया- देशभरातील लोकांमध्ये भाजप विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. शेतकरी, बेरोजगार युवक, सामान्य गरिब माणूस यांना मोदींनी फक्त झुलवत ठेवले. एकाही निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये मोदीविरोधात प्रचंड नाराजी असल्याचे मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. ते आज गोंदियामध्ये बोलत होते.
मोदी सरकारविरोधात देशातील जनतेत असंतोष - प्रफुल्ल पटेल - PM
देशभरातील लोकांमध्ये भाजप विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
![मोदी सरकारविरोधात देशातील जनतेत असंतोष - प्रफुल्ल पटेल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2876088-711-b438626c-59b3-486e-bdbf-a197703f894b.jpg)
प्रफुल्ल पटेल
प्रफुल्ल पटेल यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी ओमप्रकाश सपाटे यांनी...
शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे आजपर्यंत मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. तसेच सरकारने दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करु, असे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन फुसके निघाले. यामुळे बेरोजगारी वाढली. वाढत्या बेरोजगारीमुळे युवा वर्ग कंटाळला आहे. यामुळे युवा वर्गही सरकारच्या विरोधात असल्याचेही पटेल म्हणाले.