महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चुलबंद नदीत अवैध वाळू उपसा; पोलिसांच्या धाडसी कारवाईत ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त - वाळू उपसा गोंदिया न्यूज

चुलबंद नदीपात्रातील वाळू उत्खननाच्या ठिकाणी छापेमारी केली. या धडक कारवाईत पोलिसांनी वाळू माफियांचे दहा ट्रॅक्टरसह १४ वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत एकूण ५३ लाख ५ हजार ८०० रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

illegal sand smuggling
चूलबंद नदी वाळू उपसा

By

Published : Oct 16, 2020, 11:27 AM IST

Updated : Oct 16, 2020, 11:37 AM IST

गोंदिया- सडक-अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चुलबंद नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत होता. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चुलबंद नदीपात्रातील वाळू उत्खननाच्या ठिकाणी छापेमारी केली. या धडक कारवाईत पोलिसांनी वाळू माफियांचे दहा ट्रॅक्टरसह १४ वाहने जप्त केली आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व त्यांच्या चमुने ही १४ ऑक्टोबरच्या पहाटे तीन वाजता पिपरी परिसरात ही कारवाई केली.

चूलबंद नदी वाळू उपसा

चुलबंद नदीच्या घाटातून जेसीबीच्या सहाय्याने चोरून रेतीचा उपसा सुरू होता. या बाबत माहिती मिळताच पोलीस पथकाने योजनाबद्ध रितीने बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास नदी पात्रात जाऊन वाळू माफियांच्या उत्खननावर धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी १० टॅक्ट्ररमधील १० ब्रास वाळू, १५ लाखाचे एक जेसीबी (एमएच ३५ एजी १६९१) एक चारचाकी (एमएच ३५ पी ०६११), दहा ट्रॅक्टर आणि ट्राली. दोन मोटारसायकली (एमएच ३५ एक्स ९९४७) आणि(एमएच ३६ एसी ८९६४) असा एकूण ५३ लाख ५ हजार ८०० रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. तर या प्रकरणात ११ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा जामीन मंजूर झाला आहे.

या संदर्भात डुग्गीपार पोलीसात भादंविच्या कलम ३७९, ३४ सहकलम ४८ (७) महाराष्ट्रातील नवीन महसूल संहिता १९६६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार धुमाळ, पोलीस हवालदार कंगाली, पोलीस नायक राउत, परीवेक्षाधीन तहसीलदार शरद कांबळे, मंडळ अधिकारी कृपानंद गजभिये, सौंदडचे वाघधरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, सी-६०, रक्षा पथक देवरी व २५ कमांडो यांनी कारवाई केली आहे.

Last Updated : Oct 16, 2020, 11:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details