महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जवानांनी उधळला घातपाताचा कट; नक्षलवाद्यांनी नाल्यात लपवून ठेवलेली स्फोटकं जप्त - घातपात

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील टेकाटोला ते मुर्कडोह गावाजवळील नाल्यात नक्षलवाद्यांनी भूसुरुंगासाठी वापरण्यात येणारी स्फोटकं लपवून ठेवली होती. सी ६० पथकाच्या जवानांनी ही स्फोटकं जप्त केली आहेत. त्यामुळे मोठा घातपात टळला आहे.

जप्त केलीली स्फोटकं

By

Published : Jun 1, 2019, 8:31 PM IST

Updated : Jun 1, 2019, 11:53 PM IST

गोंदिया- नक्षलवाद्यांनी नाल्यात लपवून ठेवलेली स्फोटकं 'सी ६०' पथकातील जवानांनी जप्त केली आहेत. नक्षलवाद्यांनी ही स्फोटकं सालेकसा तालुक्यातील टेकाटोला ते मुर्कडोह गावाजवळील नाल्यात लपवून ठेवली होती. ही स्फोटकं जप्त केल्याने भविष्यात होणारा मोठा घातपात जवानांनी उधळून लावला आहे.

जवान


सी ६० पथक गस्तीवर असताना त्यांना टेकाटोला ते मुर्कडोह गावाजवळील नाल्यात नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाची स्फोटकं लपवल्याचे आढळून आले. जवानांनी ही स्फोटकं जप्त केली आहेत. त्यामुळे मोठा घातपाताचा कट उधळला गेला आहे. याप्रकरणी सी ६० पथकातील जवान पुढील तपास करत आहेत. नक्षलवाद्यांनी यापूर्वी भूसुरुंग स्फोट घडवून आणून १४ जवानांचा बळी घेतला होता.

जप्त केलीली स्फोटकं
Last Updated : Jun 1, 2019, 11:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details