गोंदिया -सध्याय आयपीएलचा हंगाम सुरू आहे. या आयपीएलवर सट्टेबाजी लावणारे सट्टेबाजसुद्धा सक्रिय झाले आहेत. दुबई येथे सुरू असलेल्या आयपीएलवर गोंदिया शहरात सट्टा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या गुप्त माहितीवर गोंदिया पोलिसांनी सट्टेबाजारावर धाड टाकत २० लोकांवर गुन्हे दाखल केले आहे. तर य २० आरोपी पैकी ६ आरोपी हे नागपूर येथील असल्याचे समोर आले आहे.
गोंदियात आयपीएलवरील सट्टे बाजारावर पोलिसांची धाड, नागपुरातील ६ आरोपी अटकेत - नागपूरचे ६ सट्टेबाज गोंदियात अटक बातमी
देशातील मध्यभागी असलेल्या नागपूर शहरात आयपीएलवर सर्वात जास्त सट्टा लावला जात असतो. त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केल्याने नागपुरातील सट्टेबाज लोकांनी आता गोंदिया येथे धाव घेत सट्टा सुरू केल्याची गुप्त माहिती गोंदिया पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे आठवड्याभरात चार वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत २० लोकांवर गुन्हे दाखल केले. यावेळी त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केला.
नागपुरात मोठ्या प्रमाणात पोलीस कारवाया होत असल्याने सट्टा किंग लोकांनी आपला मोर्चा आता लहान शहरांकडे वळविला आहे. दरवर्षी आयपीएल क्रिकेटची देशातच नाही तर सातसमुद्र पार पर्यंत धूम असते. या वर्षी कोरोनामुळे आयपीएल उशिरा सुरू करण्यात आले व तेही भारतात न होता दुबई येथे आयपीएलचे सामने सुरू आहेत. आयपीएल सुरू होताच, भारतात सट्टे बाजार जोमात सुरू होतो. दरवर्षी अनेक सट्टे बाजांवर कारवाई केली जाते. तर देशातील मध्यभागी असलेल्या नागपूर शहरात आयपीएलवर सर्वात जास्त सट्टा लावला जात असतो. त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केल्याने नागपुरातील सट्टेबाज लोकांनी आता गोंदिया येथे धाव घेत सट्टा सुरू केल्याची गुप्त माहिती गोंदिया पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे आठवड्याभरात चार वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत २० लोकांवर गुन्हे दाखल केले. यावेळी त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. यात सहा आरोपी हे नागपूर जिल्ह्याच्या कामठी येथील असून दोन आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. या सट्टेबाजांचे नेटवर्क कुठपर्यंत पोहोचले आहेत त्याचा तपास आता पोलीस करत आहे.