गोंदिया - दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गणेश मूर्तीची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. पोलीस स्टेशन डुगीपार द्वारे सडक-अर्जुनी परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, शेंडा चौक येथे दंगा काबू योजनेची ड्रिल घेण्यात आली.
गणेशोत्सव; सडक-अर्जुनी येथे डुग्गीपार पोलिसांकडून दंगा काबू पथकाची रंगीत तालीम - police mock drill in sadak arjuni
सडक-अर्जुनी परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, शेंडा चौक येथे दंगा काबू योजनेची ड्रिल घेण्यात आली. देवरी, नवेगाव बांध, अर्जुनी, मोरगाव, चिचगड व पोलीस उपमुख्यालय देवरी येथील पोलिसांनी या रंगीत तालीममध्ये सहभाग घेतला.
दंगा काबू पथकाची रंगीत तालीम
दंगा काबू पथकाच्या रंगीत तालीममध्ये पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस स्टेशन देवरी, नवेगाव बांध, अर्जुनी, मोरगाव, चिचगड व पोलीस उपमुख्यालय देवरी येथील पोलिसांनी या रंगीत तालीममध्ये सहभाग घेतला. सदर दंगा काबू पथकाच्या ड्रिलला नायब तहसीलदार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, पोलीस निरीक्षक आदी या रंगीत तालीममध्ये सहभागी झाले होते.