गोंदिया -नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणण्यासाटी साठवून ठेवलेल्या साहित्यासह जुन्या पाचशे रुपयाच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहे. उमरपायली-जुनेवाणीरोड लगतच्या पहाडीवर जंगल परिसरात ही कारवाई करण्यात आली.
नक्षलवाद्यांनी जंगलात साठवून ठेवलेले स्फोटक साहित्य जप्त - gondia latest news
22:06 January 24
19:32 January 24
हे साहित्य जप्त -
उमरपायली-जुनेवाणीरोडच्या लगत पहाडीवर जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी काही साहित्य साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत युरिया खत, ५० ग्रॅम निरमा, कॉस्टीक सोडा, एक स्विच बटन, लाल रंगाची इलेक्ट्रिक वायर १० फूट, चार लाख ४० हजार रुपये एकूण किमतींच्या जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा, गंधक १० ग्रॅम, एक कापूरवडी, एक जुनी भरमार बंदूक (सिंगल बोर) असे साहित्य जप्त केले.
हेही वाचा - पुणे विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे अभ्यास केंद्राची निर्मिती लवकरच - उदय सामंत