गोंदिया - देशासह राज्यात लॉगडाऊन असल्यामुळे दारू दुकानेही बंद आहेत. त्यामुळे दारूचे अवैध तस्करी आणि निर्मिती वाढली आहे. एवढेच नाही तर काही लोक मोहफुलांची दारू तयार करून मोठ्या प्रमाणात अवैद्य रित्या विक्री करत आहेत. अशाच प्रकारे दारू तयार करून विक्री करणाऱ्यांवर गोंदिया पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अवैद्यरित्या मोहफुलाची दारू तयार करणाऱ्या भट्टीवर धाड
गोंदिया येथील किन्ही गावाजवळील जंगलात मोहफुलापासून दारू तयार करण्यात येत होती. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे यांना माहिती मिळाली. प्राप्त माहितीनुसार पोलीस पथकाने शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास या दारू भट्टीवर धाड टाकली. या कारवाईत मनोज सुदाम डहाट (रा. किन्ही) याच्याकडून मोहफुल ५४० किलो व एक ड्रम असा एकूण ३२ हजार ९०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला.

रावणवाडी पोलिसांनी या कारवाईचा पंचनामा करत महारष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ) अन्वये आरोपी सुदाम डहाट याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.