गोंदिया - स्वयंचलित धान कापणी यंत्राची अनुदान रक्कम वगळता इतर रक्कम मिळण्यासाठी वैभव मुंगले याने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. सहकाऱ्यामार्फत तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (२१ मे) रंगेहात पकडले.
दोन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात, सहकाऱ्यासोबत लाच स्वीकारताना रंगेहात अटक
तक्रारीच्या आधारावर २१ मे रोजी सापळा रचण्यात आला. आरोपीने त्याच्या सहकाऱ्यामार्फत तडजोडीअंती १५ हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले. दोघांवरही पोलिसांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार हे कृषोन्नती धान उत्पादक शेतकरी गटाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय कारंजा येथे शासनाकडून स्वयंचलित धान कापणी यंत्र खरेदी करण्याचे ठराव पारित करून घेतला होता. धान कापणी यंत्र मिळविण्यासाठी प्रस्ताव वैभव मुंगले यांच्याकडे सादर केला होता. याविषयी विचारपूस करण्यासाठी तक्रारदार गेले असता, मुंगले याने तक्रारदारास यंत्राची किंमत १ लाख ६५ हजार असल्याचे सांगून अनुदानाची रक्कम १ लाख ३५ हजार वगळता लाभार्थी रक्कम ३० हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. याव्यतिरिक्त वरचे २० हजार रुपये द्यावे लागतील, तेव्हा काम होईल, असेही सांगितले.
दरम्यान लाच देऊन काम करण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १९ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारावर २१ मे रोजी सापळा रचण्यात आला. आरोपीने त्याचा सहकारी गोंदिया येथील सेल्समन मॉडर्न आटोमोबाईलचा रविकांत सुखराम रावते याच्यामार्फत तडजोडीअंती १५ हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले. दोघांवरही पोलिसांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.