महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नक्षलग्रस्त गोंदियात तान्हा पोळा उत्साहात; बाल-गोपाळांसाठी सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन - बिस्किट आणि चॉकलेट

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्थ भागातील किशोरी-कणेरी या गावात तान्हा पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या निमित्त गावातील चिमुकल्यांनी गर्दी केली होती.

उत्कृष्ट नंदी बैल स्पर्धा

By

Published : Aug 31, 2019, 11:50 PM IST

गोंदिया - श्रावण महिन्याच्या शेवट व भाद्रपद महिनेच्या प्रथमेला पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांचा तान्हापोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणा निमित्ताने केशोरी-कणेरी या गावामध्ये शेकडोंच्या संख्येने चिमुकले नटून - थटून वेशभूषा करुन मोठ्या उत्साहाने या तान्हा पोळ्यात सहभागी झाले. यामध्ये सहभाग घेतलेल्या चिमुकल्यांना भेट वस्तू व रोख रक्कम देऊन पूरस्कृत करण्यात आले. तसेच बालगोपाळांना बिस्किट आणि चॉकलेट देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले.

बालगोपाळांसाठी सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन


गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल आहे. या जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्थ भागातील किशोरी-कणेरी या गावात तान्हा पोळ्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला असून या निमित्त गावातील चिमुकल्यांनी गर्दी केली होती. तसेच हा उत्सव पाहण्यासाठी गावातील गावकऱ्यांनी देखील मोठी गर्दी केली होती.

उत्कृष्ट नंदी बैल स्पर्धेचे बक्षिस वितरण

केशोरी गावातील बहुद्देशीय युवा कल्याण मंडळाच्या वतीने हा उत्सव साजरा करण्यात आला. गेल्या 25 वर्षांपासून येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात येते. दरम्यान, महात्मा गांधी चौकात तान्ह्यापोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात 400 पेक्षा जास्त लहान मुलांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, मुलांनी शेतकरी, राधा, कृष्ण, शंकर, वारकरी अशा विविध प्रकारच्या वेशभुषा करुन तान्हा पोळ्यात सहभाग घेतला. यानंतर या मुलांची आणि त्यांच्या नंदीची संपूर्ण गावातून फेरी काढण्यात आली. दरम्यान, हनुमान मंदिराजवळ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर बहुद्देशीय युवा कल्याण मंडळाच्या वतीने उत्कृष्ट नंदी बैलाला भेट वस्तू व रोख रक्कम देऊन पुरस्कृत करण्यात आले. तसेच उर्वरित सर्व नंदी बैलाला घेऊन येणार्‍या बाळगोपाळांना बिस्किट देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details