गोंदिया - दिवाळीनंतर जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दररोजच मृतांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याचे बघावयास मिळत आहे. आजघडीला कोरोना बाधितांची संख्या ११ हजारचा आकडा पार करून पुढे गेला आहे. तर एकूण मृतांची संख्या १५४ वर पोहोचली आहे. त्यातच लॉकडाऊनचे नियम शिथील केल्याने कोरोनावाढीची बाब गंभीर होत आहे. सध्य स्थितीत कोरोनाने गंभीर असलेल्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी जीवनदायी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्लाझ्माची मागणी वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर लवकरच जिल्ह्यात प्लाझा सेंटर कार्यन्वित करण्यात येणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात प्लाझ्मा युनिट येऊन ४ महिने लोटले तरी प्लाझ्मा युनिट सुरू झालेली नाही. मात्र आता दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाटत असल्याने आता प्लाझ्मा मशीन सुरू करण्यासाठी ज्या काही त्रुटी आणि टेक्निशियन पद नव्हते, ते आता भरण्यात आले व या आढवाड्यात प्लाझ्मा सुरू करण्यात येण्याचे सांगितले आहे.
या आठवड्यात होणार प्लाझ्मा सुरू-