गोंदिया -तिरोडा तालुक्यातील पिंडकेपार या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाने लाखोंचा भ्रष्टाचार केला असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले. याबाबत केलेल्या चौकशीत तो दोषीही आढळला. मात्र, अद्याप या ग्रामसेवकावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
पिंडकेपार ग्रामपंचायतीत 'ग्रामसेवकाने' केला लाखोेंचा भ्रष्टाचार हेही वाचा... डीआयजी निशिकांत मोरे विनयभंग प्रकरणातील मुलगी सापडली; आत्महत्येची चिठ्ठी लिहून झाली होती बेपत्ता
पिंडकेपार येथील ग्रामसेवकाने २०१८ पासून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे आढळून आले. गावातील रहिवासी असणाऱ्या प्रल्हाद भाष्कर यांनी माहितीच्या अधिकारात प्राप्त केलेल्या माहितीत ही बाब उघडकीस आली. ग्रामसेवकाने पथदिवे, संगणक अशा विविध वस्तुंच्या खरेदीत घोटाळा केला. याची तक्रार पंचायत समिती तिरोडा येथे केली गेली. यानंतर खंडविकास अधिकारी यांनी याबाबत चौकशी केल्यानंतर भ्रष्टाचार झाला असल्याचे निदर्शनात आले.
हेही वाचा... उदयनराजे यांना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही - नवाब मलिक
या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल विभागीय आयुक्त नागपूर यांना पाठवण्यात आला. विभागीय आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाही करण्याचे आदेश दिले. मात्र, हे आदेश देऊन आता आठ महिने उलटून गेले. तरी अद्याप कोणतीही कारवाही करण्यात आलेली नाही. या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार प्रल्हाद भाष्कर यांनी केली आहे.