गोंदिया -जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथे ग्राम पंचायत कार्यालयात काशीराम मेश्राम (३५ वर्ष, रा. शिरोली) या व्यक्तीने येऊन विस्तार अधिकारी यांना मारहाण केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयातील सामानाची तोडफोडही केल्याची घटना समोर आली आहे. गणेश पद्माकर हरडे असे या विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. या आरोपीविरुद्ध योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामसेवक संघटनेने दिला आहे.
गोंदियातील ग्राम पंचायतीमध्ये विस्तार अधिकाऱ्याला मारहाण, ग्रामसेवक संघटनेचा आंदोलनाचा इशारा
आरोपी विरूद्ध सरकारी कामात हस्तक्षेप करणे, शिवीगाळ करून मारहाण, आणि कार्यालयातील सामानाची तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी २५६/२० अन्वये कलम ३२३, ३५३, ५०४, ५०६ भा. दं. वि. सहकलम ३(२)(क) सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनी अशोक अवचार करत आहेत.
या घटनेची मिळालेली माहिती अशी, की २५ सप्टेंबरला विस्तार अधिकारी गणेश पद्माकर हरडे (४८ वर्ष) हे सकाळी 11.30 वाजता आपल्या कार्यालयात उपस्थित होते. यावेळी अचानक आरोपीने ग्राम पंचायतीमध्ये येऊन त्यांना मारायला सुरुवात केली. दरम्यान त्यांचा बचाव करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. ग्राम पंचायत कार्यालयातील सामानाची तोडफोड व कार्यरत कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरूद्ध काल शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी विरूद्ध सरकारी कामात हस्तक्षेप करणे, शिवीगाळ करून मारहाण, आणि कार्यालयातील सामानाची तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी २५६/२० अन्वये कलम ३२३, ३५३, ५०४, ५०६ भा. द. वी. सहकलम ३(२)(क) सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनी अशोक अवचार करत आहेत.आरोपीवर कडक कार्यवाई करण्यात यावी. योग्य ती कार्यवाही न झाल्यास ग्रामसेवक संघटनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.