गोंदिया - गोरेगाव तालुक्यातील चिचगावातील एका घरावर पॅराशूटसारखा दिसणारा फुगा घरावर पडल्याने गावात एकच खळबळ उडाली. नागपूर येथील हवामान विभागाद्वारे दोन फुगे हवेत सोडले असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लोकांनी सूटकेचा नि: श्वास सोडला.
चिचगावमध्ये अपरिचीत फुगा पडल्याने गावकऱ्यांमध्ये भीती
नागपूर येथील हवामान विभागाद्वारे रोज पहाटे ५ वाजता आकाशात दोन पॅराशूट सारखे दिसणारे फुगे सोडले जातात. या माध्यमातून वाऱ्याचा वेग आणि हवामानाचा अंदाज घेतला जातो.
नागपूर येथील हवामान विभागाद्वारे रोज पहाटे ५ वाजता आकाशात दोन पॅराशूटसारखे दिसणारे फुगे सोडले जातात. या माध्यमातून वाऱ्याचा वेग आणि हवामानाचा अंदाज घेतला जातो. एका विशिष्ट वेळेनंतर हे फुगे आकशातून खाली पडतात. मात्र, बहुतांश वेळेला जंगलात किंवा पाण्याच्या ठिकाणी फुगे पडतात. मात्र. आज हा फुगा ग्रामीण भागातील चिचगाव येथे राहणाऱ्या दखने यांच्या कौलारू घरावर पडताच मोठा आवाज झाला. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये अगोदर कोरोनाची भीत असताना हा फुगा पडल्याने आणखी भीतीचे वतावरण निर्माण झाले.
गावात राहणारे मोरेश्वर कटरे यांनी हा फुगा घरावरून काढला असता, त्यात दोन मोठ्या यंत्रसारखी वस्तू दिसून आल्या. त्याचा लाईट जळत असल्याने त्यांनादेखील भीती वाटली. मात्र, गावातील इलेक्ट्रिकल काम करणाऱ्या तरुणाला याची माहिती देण्यात आली असून, स्वीच बंद झाल्याने गावकऱ्यांची भीती दूर झाली. तसेच फुग्यासोबत एक कीट ही आढल्याने त्या कीटवर 'भारत मौसम विज्ञान विभाग नई दिल्ली' असे लिहिले होते. त्यानंतर ही बातमी हवामान खात्याला देण्यात आली. त्यांनी सांगितले की, नागपूर हवामान हवामान विभागाने हे यंत्र सोडले होते. त्यामुळे गावकऱ्यांची भीती दूर झाली.