महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदारांनी दत्तक घेतलेल्या गावातील लोकांचे रोजगारासाठी परप्रांतात पलायन

आमदार विजय रांगडाले हे तिरोडा विधानसभा शेत्रातून भाजपच्या तिकिटावर २०१४ ला जिंकून आले होते. आमदार दत्तक गाव योजनेअंतर्गत त्यांनी चिखली गाव दत्तक घेतले. या गावात शौचालय, सिमेंट रस्ते, शाळेची दुरुस्ती, सभागृह, पाणी पुरवठा, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेततळे त्याच प्रमाणे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून दत्तक गावात विकास कामे करून घेतली आहेत. या कामामुळे गावातील काही नागरिक संतुष्ट आहेत तर काही नागरिकांच्या अपेक्षा यापेक्षा वेगळ्या आहेत.

आमदारांनी दत्तक घेतलेल्या गावातील लोकांचे रोजगारासाठी परप्रांतात पलायन

By

Published : Oct 1, 2019, 11:02 AM IST

Updated : Oct 1, 2019, 7:51 PM IST

गोंदिया- तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रांगडाले हे आमदार आहेत. त्यांनी आमदार दत्तक योजने अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत चिखली हे गाव दत्तक घेतले होते.त्यांनी गावाला सर्वाधीक स्वच्छ आणि शैक्षणिक, भौतिक सुविधायुक्त विकासाला प्राधान्य देत मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी योजना आणण्यास आमदार रांगडाले अयशवी ठरले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केले आहे.

हेही वाचा - आदित्य ठाकरे वरळीतून मैदानात, ठाकरे घराण्याची परंपरा मोडीत

आमदार विजय रांगडाले हे तिरोडा विधानसभा शेत्रातून भाजपच्या तिकिटावर २०१४ ला जिंकून आले होते. आमदार दत्तक गाव योजनेअंतर्गत त्यांनी चिखली गाव दत्तक घेतले. या गावात शौचालय, सिमेंट रस्ते, शाळेची दुरुस्ती, सभागृह, पाणी पुरवठा, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेततळे त्याच प्रमाणे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून दत्तक गावात विकास कामे करून घेतली आहेत. या कामामुळे गावातील काही नागरिक संतुष्ट आहेत तर काही नागरिकांच्या अपेक्षा यापेक्षा वेगळ्या आहेत. हे तर शासनाकडून प्रत्येक गावात केल्याच जातात. परंतू, आमदारांनी गावाची आर्थिक परिस्तिथी सुधारण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावातील सुशीक्षीत बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले असते. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी सर्व प्रथम पैशांची गरज असते, कर्ज योजनेच्या माध्यमातुन बेरोजगारांना कर्ज देण्याचा प्रयत्न आमदारांनी करायला हवा होता. नाईलाजाने येथील बेरोजगार अन्य प्रांतांत पलायन करत आहेत, असे गावकऱ्यांनी सांगीतले आहे.

हेही वाचा - ... म्हणून संभाजी भिडे बुद्धांना घाबरतात, त्यांची विचारसरणी विषारी -तुषार गांधी

Last Updated : Oct 1, 2019, 7:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details