गोंदिया - जिल्ह्यातील सडक-अर्जुनी येथील सेवानिवृत्त शिक्षकाचे वेतन उपदान व अंशराशीकरणाची रक्कम अदा करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सडक-अर्जुनी पंचायत समितीच्या सहायक लेखा अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले.
दहा हजाराच्या लाचप्रकरणी पंचायत समितीचा लेखाधिकारी जाळ्यात - लाचप्रकरणी लेखाधिकारी जाळ्यात
तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांनी सडक-अर्जुनी पंचायत समितीतील शिक्षण विभागात आपले वेतन उपदान व अंशराशीकरण रकमेच्या देयकाबाबत अर्ज केला होता. या विषयी पंचायत समितीतील लेखा अधिकाऱ्याकडे संबंधित शिक्षकांनी वारंवार विचारणा केली असता त्यांनी देयके काढण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली.
खेमलाल गजभिये असे त्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांनी सडक-अर्जुनी पंचायत समितीतील शिक्षण विभागात आपले वेतन उपदान व अंशराशीकरण रकमेच्या देयकाबाबत अर्ज केला होता. या विषयी पंचायत समितीतील लेखा अधिकाऱ्याकडे संबंधित शिक्षकांनी वारंवार विचारणा केली असता त्यांनी देयके काढण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली.
याप्रकरणी तपासाअंती गोंदिया ‘एसीबी’ने मंगळवारी (९ जून) सापळा रचून आरोपीला लाच घेताना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी डुग्गीपार पोलीस ठाण्यात आरोपीवर लाचलुचपत प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.