महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आढावा तिरोडा विधानसभा मतदारसंघाचा - कोण मारणार 'बाजी'?

तिरोडा विधानसभेचा इतिहास पाहता या मतदारसंघात एकदा आमदार म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराला कुठलाही पक्ष पुन्हा उमेदवारी देत नाही. त्यामुळे यावेळी देखील भाजप विद्यमान आमदाराला डावलून कुणाला उमेदवारी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तिरोडा

By

Published : Sep 18, 2019, 11:53 AM IST

गोंदिया - राष्ट्रवादी काँग्रेसचा गड समजला जाणारा तिरोडा विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार विजय रहांगडाले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार दिलीप बनसोड यांना डावलून महिला जिल्हा अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे दिलीप बनसोड यांनी बंडखोरी करत अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी याचा फायदा भाजपला याठिकाणी झाला होता.

प्रतिनिथी ओमप्रकाश सपाटे यांनी घेतलेला आढावा

हेही वाचा - 'अजून म्हातारा झालो नाही, अनेकांना घरी बसवण्यासाठी बाहेर पडलोय'

तिरोडा विधानसभेचा इतिहास पाहता या मतदारसंघात एकदा आमदार म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराला कुठलाही पक्ष पुन्हा उमेदवारी देत नाही. त्यामुळे यावेळी देखील भाजप विद्यमान आमदाराला डावलून कुणाला उमेदवारी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - प्रतिष्ठित अशा 'आयबीसी' पुरस्कारावर 'ईटीव्ही भारत'ची मोहर!

तिरोडा मतदारसंघात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असून शेती ही परवडणारी नाही अशी, शेतकऱ्यांची नेहमी ओरड असते. त्याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे आमदार विजय रहांगडाले हे निवडून आल्यावर त्यांनी सर्वात प्रथम शेतकऱ्यांना सिंचन सोयी उपलबद्ध करून देण्यासाठी लिफ्ट येरिकेशनच्या माध्यमातून नदी पात्रातील पाणी हे तलावात टाकत अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले. शेतकऱयांना फायदा होईल त्यामुळे मतदारसंघातील ३२ हजार हेकटर शेतजमीन ही सिंचनाखाली येणार आहे. मात्र, आमदार विजय रहांगडाले यांनी मतदारसंघात सिंचनाव्यतिरिक्त कुठलाही उद्योग आणला नाही. तर, आघाडी सरकारच्या काळात मतदारसंघात अदानी पवार प्लांट उभारण्यात आला असून स्थानिकांना डावलून परप्रांतियांना काम दिल्याने तरुणांमध्ये नाराजीचे सूर पहायला मिळत आहे.

तिरोडा विधानसभेचा इतिहास पाहता या मतदारसंघात निवडून आलेल्या उमेदवाराला पक्ष पुन्हा तिकीट देत नाही. मात्र, या निवडणुकीत या मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर पक्ष पुन्हा संधी देणार असा विश्ववास आमदार विजय राहगडाले यांना आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसदेखील पुन्हा माजी आमदार दिलीप बनसोड यांना तिकीट देते की नवीन चेहऱयाला संधी देणार, हे पाहणे महत्तवाचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details