महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियात कोण मारणार बाजी? - गोंदिया विधानसभा निवडणूक निकाल

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडले. 288 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले. राज्यात सरासरी 60 टक्के मतदान झाले. गोंदिया जिल्ह्यातील चार मतदार संघात 64.32 टक्के मतदान झाले.

गोंदिया जिल्ह्यातील उमेदवार

By

Published : Oct 23, 2019, 9:04 AM IST

Updated : Oct 23, 2019, 12:57 PM IST

गोंदिया - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडले. 288 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले. राज्यात सरासरी 60 टक्के मतदान झाले. गोंदिया जिल्ह्यातील चार मतदार संघात 64.32 टक्के मतदान झाले.

काय होती २०१४ची परिस्थिती?

2014 च्या विधानसभा निवडणुकीत चारपैकी 3 जागी भाजपने बाजी मारली होती तर एक जागा काँग्रेसला मिळाली होती. तिरोडा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विजय रहांगडाले यांनी अपक्ष उमेदवार दिलीप बनसोड यांचा पराभव केला होता. आमगाव मधून काँग्रेसच्या रामरतन बापू राऊत यांना भाजपच्या संजय पूरम यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पुरम यांना 62 हजार 590 मते मिळाली होती. गोंदिया विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल यांनी 62 हजार 701 मते मिळवत विजय मिळवला होता. त्यांनी भाजपच्या विनोदकुमार अग्रवाल यांचा पराभव केला होता. अर्जुनी मोरगावमधून भाजपच्या राजकुमार बडोले यांनी काँग्रेसच्या राजेश नंदगवळे यांचा पराभव केला होता.

असे आहे २०१९चे चित्र-


यावर्षी तिरोडाचे विद्यमान आमदार विजय रहांगडाले यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुड्डू बोपचे यांचे आव्हान आहे.आमगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या संजय पुरम आणि काँग्रेसच्या सहसराम कारोटे आमनेसामने आहेत. गोंदिया मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले विद्यमान आमदार गोपालदास अग्रवाल, अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल आणि काँग्रेसच्या अमर वऱ्हाडे यांच्यात मुख्य लढत आहे.अर्जुनी मोरगावमधून भाजपचे विद्यमान आमदार राजकुमार बडोले आणि काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे यांच्यात चुरस आहे.

गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप हे तीनही पक्ष आपले वर्चस्व सिद्ध करण्यास उत्सुक आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले विद्यमान आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर जनता आपला विश्वास कायम ठेवणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Last Updated : Oct 23, 2019, 12:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details