गोंदिया - कोरोनाशी लढण्यासाठी चांगली रोगप्रतिकारशक्ती पाहिजे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या उपयुक्त असून आहारात समावेश केल्याने आरोग्यसंपन्न राहता येईल. तालुका कृषि अधिकारी कार्यालय व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त वतीने नविन प्रशासकीय इमारत गोंदिया येथे, 11 ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाजी महोत्सवाचे आयोजन - Organizing Ranbhaji Mahotsav
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गोंदिया येथे तालुका कृषि अधिकारी व आत्मा अंतर्गत रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रानभाज्या महोत्सवात त्यांच्या गुणधर्मानुसार विविध आजारांवर त्यांचा उपयोग व्हावा, त्याबद्दल शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना व शेतकऱ्यांना त्याची माहिती व्हावी, यासाठी त्यांच्या वापरानुसार जिल्ह्यातील आदिवासी भागातील जंगलामध्ये मिळणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या.
रानभाज्यांमध्ये औषध गुणधर्म तसेच शरिराला आवश्यक असणारे पौष्टिक घटक असतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्या अतिशय उपयुक्त आहेत. रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे त्या पूर्णपणे सेंद्रीय असतात. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गोंदिया येथे तालुका कृषि अधिकारी व आत्मा अंतर्गत रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रानभाज्या महोत्सवात त्यांच्या गुणधर्मानुसार विविध आजारांवर त्यांचा उपयोग व्हावा, त्याबद्दल शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना व शेतकऱ्यांना त्याची माहिती व्हावी, याकरीता त्यांच्या वापरानुसार जिल्ह्यातील आदिवासी भागातील जंगलामध्ये मिळणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या. परिसरातील बाजारामध्ये यांची विक्री करुन जिल्ह्यातील आदिवासी व इतर शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा मिळेल याकरीता राज्य शासनाच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या रानभाजी महोत्सवात एकूण 35 स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉल बघण्या साठी अनेकांनी येऊन या रानभाज्यांच्या गुणधर्माविषयी माहिती जाणून घेतली. या महोत्सवात शेतकऱ्यांनी बांबूकोंब (वास्ते), केवकंद, भुईनिंब, शतावरी, हेटीचे फुले, तरोटा भाजी, आंबाडी भाजी, उंदीरकंद, भुई आवळा, कोल्हारी, अळुचे पान, पातूर भाजी, कोचईचे पान, केना भाजी, खेडा भाजी, काटेकोरसा, केना लसून, कंबरमोडी, विधारा, चेच भाजी, कुंदरु, कोचई गुया, करमा भाजी, कोचईचे पान, सुरण, हरतफळी, मास्टर भाजी, मुंगना भाजी, बरमा राकस पान, लसून पान, करमोती भाजी, हरतपरी भाजी, चायपत्ती पाने, गुरवेल, फतरी भाजी, करवंद, कोयलारी भाजी, बारमासी लसून, कुरवा भाजी, काटवल, हिड्डे, भुईनिंब, गुंजा, भुई आवळा, रक्तपाकळी साल, करमता भाजी, खापरखुटी, गेळ फळ, खरपेंद्रा, अद्रक पान, लडंगा भाजी, खोबर जडी, शेरडीरा, मटारु, केन्या भाजी, चेचरी भाजी, उंदिरकांद, शेवगा, पातर भाजी, पदीना, आंबाडी भाजी, एरंडी पान, पारीजात पान, कुडा शेंग, केळभाजी, भुईमुंग, हिरडा, भेरा, आवळा, मलखामनी, मुंगना पान, केवकांदन पान, चेच भाजी, कुडव्याचे फुल, शेवगा पान, खापरखुटी, केवकांदा इत्यादी रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आला होते.