गोंदिया- पर्यावरणाच्या संरक्षणासाठी गोंदियातील पब्लिक शाळेत विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी '16 श्रृंगार' या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे पालकांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्याचा होता. 'हिरवळीचे वान, सौभाग्याची शान' असा या कार्यक्रमाचा विषय होता.
हिरवळीचे वान, सौभाग्याची शान..! पर्यावरण संरक्षणासाठी गोंदियात '16 श्रृंगार' कार्यक्रम - Gondia latest news
यावेळी पालकांची 'सखीं श्रृंगार' स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 16 या श्रृंगाराबद्दल प्रश्न विचारण्यात आले. तसेच उत्कृष्ट सखींना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पालकांची 'सखीं श्रृंगार' स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 16 या श्रृंगाराबद्दल प्रश्न विचारण्यात आले. तसेच उत्कृष्ट सखींना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आले.
सखींना वानाच्या स्वरूपात रोपे तसेच शिक्षिकांना कापडी पिशव्यांचे वान देण्यात आले. प्राचार्य तलरेजा यांनी, वानाच्या स्वरूपात जी रोपे दिली आहेत. त्या रोपांची लागवड सखी करतील व आपल्या वसुंधरेला हिरवेगार करतील, असा विश्वास तलरेजा यांनी व्यक्त केला. तर विभाग प्रमुख ज्योती जगदाळे यांनी, पर्यावरण संरक्षण ही एक काळाची गरज झालेली आहे. त्यासाठी निसर्ग हिरवा कसा करता येईल? यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले.