गोंदिया - महिला दिनाचे औचित्त ( Womens Day Gondia ) साधून गोंदियातील सायकल संडे ग्रुपच्या वतीने ( Cycle Sunday Group Gondia ) आज खास महिलांसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. ( Organizing a cycle rally in Gondia ) या उपक्रमात जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी ( Nayana Gunde Participate Cycle Rally Gondia ) सहभाग घेत सायकल चालविण्याचा आनंद घेत पर्यावरण बचाव सेहत बनावचा संदेश दिला आहे. या अभिनव उपक्रमामध्ये गोंदिया शहरातील शेकडो महिला व तरुणींनी मोठ्या संख्येत भाग घेतला.
गोंदिया शहरातील सायकल संडे या ग्रुपच्या वतीने "एक दिन सायकल के नाम" हा उपक्रम मागील २०७ आठवड्यापासून चालवित आहेत. या उपक्रमांतर्गत दर आठवड्यात रविवारच्या दिवशी शहरातील तरुण तरुणी तसेच वयोवृद्ध त्याचप्रमाणे लहान मूलदेखील सहभाग घेतात. या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल आणि मानवी जीवन सुदृढ करण्यासाठी जवळपास २० ते २५ किलोमीटर सायकल चालवून सामाजिक संदेश देत असतात.
गोंदियातील सायकल संडे गुपमध्ये १० वर्षाच्या तरुणांना पासून तर ८० वर्षांचा वृद्ध व्यक्तीदेखील प्रामुख्याने सहभाग नोंदवित आहेत. गोंदियातील सायकल पट्टू मुनालाल यादव यांचा ८०वा वाढदिवसदेखील या निमित्ताने आज सायकल संडेच्या वतीने साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे महिला दिनाच्या निमित्ताने जिल्ह्याधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते देखील केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला.