गोंदीया - राज्य सरकारने मराठा समाजाला दिलासा देत आरक्षण जाहीर केले. मात्र, आरक्षणाला विरोध न करता खुल्या व इतर प्रवर्गालाही मेरिटच्या आधारावर 50 टक्के जागा देण्यात याव्यात या मागणिकरता आज गोंदिया येथे खुल्या प्रवर्गातील नागरिकांनी एकत्र येत भव्य मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे पाच हजार लोकांनी सहभाग घेतला. या मोर्चात विद्यार्थी आणि महिला मोठ्या संखेने सहभागी झाल्या होत्या.
'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' घोषणा देत गोंदियात खुल्या प्रवर्गाचा मोर्चा - Save Merit
'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन" चा नारा देत गोंदिया येथील इंदिरा गांधी स्टेडियम येथून या मोर्चा ची सुरवात झाली. गोंदिया येथील नेहरू चौक, बजाज चौक, श्री टॉकीज रोड, श्री टॉकीज चौक, गोरलाल चौक, दुर्गा चौक, चांदणी चौक, गंज बाजार , गांधी प्रतिमा, जय स्थंभ चौक, आंबेडकर चौक, व इंदिरा गांधी स्टेडियम येथे मोर्चा चा समारोप करण्यात आला.

'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' घोषणा देत गोंदियातील इंदिरा गांधी स्टेडियममधून या मोर्चाची सुरवात झाली. गोंदिया येथील नेहरू चौक, बजाज चौक, श्री टॉकीज रोड, श्री टॉकीज चौक, गोरलाल चौक, दुर्गा चौक, चांदणी चौक, गंज बाजार , गांधी प्रतिमा, जय स्थंभ चौक, आंबेडकर चौक, व इंदिरा गांधी स्टेडियम येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला.
विशेष म्हणजे आजपर्यंत खुल्या प्रवर्गातील नागरिकांनी आरक्षणाबाबत कधीच जिल्ह्यात मोर्चा काढला नव्हता. मात्र, राज्य शासन ज्याप्रमाणे विविध समाजाला आरक्षण दररोज जाहीर करत आहे. त्यावरून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतील. यामुळे शासनाने मेरिटच्या आधारावर 50 टक्के जागा द्याव्यात, ही मुख्य मागणी घेऊन सुमारे 5 हजार लोक रस्त्यावर उतरले होते.