महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट: विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन अभ्यासाचा फंडा - गोंदिया विद्यार्थी शैक्षणिक नुकसान

कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली झाली आहे. मात्र, गोंदिया येथील थोटे बंधू महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थी देखील लॅपटॉप आणि मोबाईलच्या माध्यमातून दररोज विविध विषयांची पुस्तकं डाऊनलोड करून अभ्यास करत आहेत.

Online study
ऑनलाईन अभ्यास

By

Published : May 21, 2020, 12:55 PM IST

गोंदिया - कोरोनामुळे सध्या देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सर्व शाळा, महाविद्यालये आणि क्लासेस अनिश्चित काळासाठी बंद आहेत. चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून गोंदियातील थोटे बंधू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेसद्वारे शिकवले जात आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन अभ्यासाचा फंडा

कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली झाली आहे. मात्र, गोंदिया येथील थोटे बंधू महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थी देखील लॅपटॉप आणि मोबाईलच्या माध्यमातून दररोज विविध विषयांची पुस्तकं डाऊनलोड करून अभ्यास करत आहेत.

मागील अडीच महिन्यांपासून कोरोनाने सगळे शैक्षणिक जीवन थांबवले आहे. मे महिना संपत आला तरी कोरोना संसर्ग कमी होण्याच्या या दृष्टीक्षेपात नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन क्लासेस सुरू केले आहेत. ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासाची पुस्तकं देण्यात आली आहेत, अशी माहिती प्राचार्य अंजन नायडू यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details