महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियात आमदारच्या वाहनाच्या धडकेत एकजण गंभीर जखमी - MLA vehicle accident at gondia

आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सहसराम कोरेटे हे आमगाव येथील तहसिल कार्यालयातून आढावा बैठक आटोपून देवरीकडे परत जात असताना तालुक्यातील अंजोरा येथे नवनिर्मित सिमेंट रस्त्यावर हा अपघआत झाला.

gondia
आमदारच्या वाहनाच्या धडकेत एकजण गंभीर जखमी

By

Published : Jan 13, 2020, 10:05 PM IST

गोंदिया - आमदार सहसराम कोरटे यांच्या गाडीची 45 वर्षीय व्यक्तीला धडक बसून अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सायकांळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. सुनिल तुमसरे (वय 45), असे या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

आमदारच्या वाहनाच्या धडकेत एकजण गंभीर जखमी

हेही वाचा -गोंदियामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बर्निंग ट्रकचा थरार

आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सहसराम कोरेटे हे आमगाव येथील तहसिल कार्यालयातून आढावा बैठक आटोपून देवरीकडे परत जात असताना तालुक्यातील अंजोरा येथे नवनिर्मित सिमेंट रस्त्यावर हा अपघआत झाला. या अपघातात तुमसरे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर कोरेटे यांनी जखमी तुमसरे यांना आपल्याच गाडीतून आमगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमी तुमसरे यांच्यावर ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे उपचार सुरू असून कोरेटेंच्या वाहन चालकाविरुध्द आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details