गोंदिया - जिल्ह्यतील गोरेगाव तालुक्यातील शहारवानी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असलेल्या धानुटोला येथील जंगल परिसरात वाघाने सकाळच्या सुमारास शेतकऱ्यावर हल्ला केला. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
गोंदिया : वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मुत्यू - मृत्यू
गोरेगाव तालुक्यातील शहारवानी गावातील शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला आहे.
आज (दि. 29 मार्च) सकाळच्या सुमारास शेतकरी अरुण भलावी हे शेळीसाठी चारा आणण्याकरीता जवळच्या जंगलात गेले होते. यावेळी अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला. यात त्यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांच्यासह असलेल्या तरुणाने घटनास्थळावरून धाव घेत गावकऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. लागलीच गावकऱ्यांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली. यानंतर वनविभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत अरुण यांचा मृतदेह शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेनंतर गोरेगाव तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी