महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियात दुचाकीस्वार तरुणाला टिप्परने चिरडले.. - गोंदिया

एका दुचाकीस्वाराला वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र

By

Published : Mar 9, 2020, 8:09 PM IST

गोंदिया- एका दुचाकीस्वाराला वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा गावाजवळ सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. साकेत शेंडे (वय 19 वर्षे), असे मृत युवकाचे नाव आहे.

दरम्यान, नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच काही काळ त्या परिसरात तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते. पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने परिस्थिती आटोक्यात आली. अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळवरून पळून गेला. या प्रकरणी गोंदिया ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी टिप्पर ताब्यात घेतला असून चालकाचा शोध सुरू आहे.

हेही वाचा -गोंदियात तरुणाला टिप्परने चिरडले, तरुणचा जागीच मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details