गोंदिया- लॉकडाऊनचे उल्लंघन करणे मध्य प्रदेशातील मजुरांना महागात पडले आहे. रेल्वे रुळावरून पायी जाताना इंजिनच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण जखमी झाला आहे. ही घटना सडक अर्जुनी तालुक्यातील राका या गावातील चुलबंध नदीवरील रेल्वेपुलावर आज दुपारी १२च्या सुमारास घडली.
गोंदियात रेल्वे इंजिनच्या धडकेत एका मजुराचा मृत्यू, एक जखमी - railway engine hit workers arjuni
डोमेश पाचे (वय १९) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून सूरज सत्यकार (वय २२) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. आंध्र प्रदेशच्या करीम नगरवरून २० महिला व पुरुष मजूर ३० मार्चला रेल्वेरुळावरून पायीच मध्य प्रदेशात जायला निघाले होते.
डोमेश पाचे (वय १९) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून सूरज सत्यकार (वय २२) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. आंध्र प्रदेशच्या करीम नगरवरून २० महिला व पुरुष मजूर ३० मार्चला रेल्वेरुळावरून पायीच मध्य प्रदेशात जायला निघाले होते. दरम्यान, आज दुपारी १२च्या सुमारास जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील राका या गावातील चूलबंध नदीवरील पुलावर पोहोचताच अचानक एका रेल्वे इंजिनने मजुरांना धडक दिली. या घटनेत सदर मजुरांचा मृत्यू झाला, तर इतर १८ लोक थोडक्यात बचावले आहे. दरम्यान, जखमी मजुरावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
हेही वाचा-कोरोना विषाणुच्या वेषभुषेतून दिला संसर्ग रोखण्याचा संदेश, अरुण मस्केंचा उपक्रम...