गोंदिया - चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मजूरांना घेवून जाणाऱ्या वाहनाला अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एक जण जागीच ठार तर 12 जण जखमी झाले आहेत. ही घटना सुमारास अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सिरोली-इटखेळा मार्गावर सिरोली गावाजवळ मंगळवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली.
गोंदियात मजूर घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात; एक जागीच ठार १२ जखमी - one dead and twelve are seriously injured gondia
प्रतापगड येथील खाण कंपनीत काम करणारे मजूर आपले काम संपवून गोंदियाकडे परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात गुरुप्रसाद पटले (वय 35) यांचा जागीच मृत्यू झाला. गोंदिया येथील 13 मजूर कामानिमित्त प्रतापगड येथे कामासाठी गेले होते.

हेही वाचा -तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
प्रतापगड येथील खाण कंपनीत काम करणारे मजूर आपले काम संपवून गोंदियाकडे परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात गुरुप्रसाद पटले (वय 35) यांचा जागीच मृत्यू झाला. गोंदिया येथील 13 मजूर कामानिमित्त प्रतापगड येथे कामासाठी गेले होते. दरम्यान, रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास गोंदिया येथील खाण कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या वाहनाने गोंदियाला परत जाण्यासाठी हे मजूर निघाले. मात्र, सिरोली जवळील पेट्रोल पंपासमोर असलेल्या वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वळणावरील नाल्यात वाहन उलटले. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर १२ मजूर जखमी झाले. जखमींना गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून या पैकी सहा जण गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी खाण कॉन्ट्रॅक्ट कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी अपघातग्रस्तांच्या नातेवाईक करत आहेत.