महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भात पिकवणाऱ्या जिल्ह्यात आता ड्रॅगन फळाची शेती, ईटीव्ही भारतचा विशेष आढावा - ड्रॅगन फळाची शेती

पुर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात आता प्रयोगशील आणि प्रगतीशील शेती पिकताना दिसत आहे. येथील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी धानाच्या पट्ट्यात आता ड्रगन फ्रूटचे उत्पादन घेतले आहे. याबाबत ईटीव्ही भारतने विशेष आढावा घेतला आहे.

गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी ड्रगन फ्रूटचे उत्पादन घेतले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी ड्रगन फ्रूटचे उत्पादन घेतले आहे.

By

Published : Aug 3, 2021, 4:03 PM IST

गोंदिया - धानाचे कोठार म्हणून संपूर्ण राज्यात ओळख असलेल्या पुर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात आता प्रयोगशील आणि प्रगतीशील शेती पिकताना दिसत आहे. येथील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी धानाच्या पट्ट्यात आता ड्रगन फ्रूट या पिकाची यशस्वी शेती केली आहे. यामधून ठाकूर यांना लाखो रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. तसेच, या भागातील लोकांना हे फळ खाण्यासाठीही मिळत आहे. याबाबत ईटीव्ही भारतने विषेश आढावा घेतला आहे.

गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी ड्रगन फ्रूटचे उत्पादन घेतले आहे. त्याबाबत ईटीव्ही भारते विशेष आढावा घेतला आहे.

विदेशात पिकणाऱ्या ड्रॅगन फळाची लागवड आता गोंदियात

धानाचा कोठार असलेल्या धान उत्पादकांचा जिल्हा ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्याची ओळख आता हळूहळू बदलत चालली आहे. केवळ धानाच्या शेतीवरच अवलंबून न राहता जिल्ह्यात आता शेतकरी धानाच्या शेतीचा शोधत आहेत. यामध्ये आता विदेशात पिकणाऱ्या ड्रॅगन फळाची लागवड येथील शेतकरी आपल्या शेतात करत आहेत. याचा यशस्वी प्रयोग गोंदिया तालुक्यातील मजितपूर येथील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी केला आहे. परदेशात पिकणाऱ्या फळांची लागवड आपल्या देशात करून, त्याचे उत्पादन घेणे तसे, आव्हानात्मक असते. त्यातच त्या पिकाला लागणारी सुपीक जमीन खते अशा अनेक प्रकारचे आव्हानं समोर असतात. मात्र, यावर विचार करत त्यातच जैविक शेतीच्या क्षेत्रात अग्रेसर राहणारे कृषी व्यवसायीक शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी, परदेशी फळाच्या शेतीचा प्रयोग आपल्या 10 एकर शेतात यशस्वी केल आहे.

ड्रॅगन फळ काय आहे?

थायलंड, व्हिएतनाम व श्रीलंकेसारख्या देशात या फळाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागील तीन चार वर्षांपासून या फळाची भारतात लागवड केली जात आहे. धान उत्पादनासाठी प्रसिध्द असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील भालचंद्र ठाकूर यांनी ड्रगन फळाची यशस्वी शेती करून, त्यामधून लाखोंचा नफासुद्धा कमवला जात आहे. ड्रॅगन फ्रूट हे फळ तसे, श्रीमंतांचे फळ म्हणून ओळखला जाते. मात्र, ते गोरगरिबांना मिळावे या उद्देशाना आपण हा प्रयोग केल्याचे भालचंद्र ठाकूर सांगत आहेत.

गोंदिया जिल्ह्याची ओळख म्हणजे भाताचा कोठार

गोंदिया जिल्ह्याची ओळख म्हणजे भाताचा कोठार अशी आहे. ही ओळख धानपिक येथील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. मात्र, गोंदियातील प्रगतीशील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी नेहमीच आपल्या शेतात नवनवे प्रयोग केले आहेत. आता त्यांनी आपल्या १० एकर शेतात ड्रॅगन फ्रूटची शेती केली आहे. तसेच, त्यांनी ही शेती यशस्वी करूनही दाखवली आहे. धन पिकाला फाटा देत त्यांनी या ड्रॅगनची शेती यशस्वी करून दाखवली आहे. तर, धान पिकाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते, त्यामुळे येथील शेतकरी कधी कोरड्या तर, कधी ओल्या दुष्काळाच्या सावटात सापडतो. तेव्हा ड्रॅगन हा व्हीयतनाम देशाने अतिशय कमी पाणी आणि कमी कालावधीत विकसित केलेल्या फळाची जात आहे. त्यामुळे कमी पाणी, कमी खर्चात ठाकूर यांनी ड्रॅगन फळाची बाग फुलवली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील लोकांना आता ड्रॅगन फ्रूट चाखता येणार

एकदा या ड्रॅगन फळाचे झाड लावले, तर ते २५ वर्षापर्यंत राहते. त्यामुळे ही शेती कमी पाण्याने व वर्षाणू-वर्ष चालणारी शेती आहे. सर्वसामान्य नागरीकांना हे फळ कमी खर्चात खाता यावे, यासाठी भालचंद्र ठाकूर यांचा प्रयत्न आहे. ड्रॅगन फळाची शेती ही थायलंड, व्हिएतनाम किंवा श्रीलंका देशात मोठ्या प्रमाणावर केली जाते. आता ड्रॅगनची शेती गोंदियासारख्या धानाच्या पट्ट्यातही यशस्वीरीत्या करण्यात ठाकूर यांना यश आले आहे. जिल्ह्यातील लोकांना आता ड्रॅगन फ्रूट चाखता येणार आहे, हे निश्चित आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details