महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्प आजही तहानलेलेच, शेतकरीही चिंतेत

राज्यात सर्वत्र पावसाचा प्रकोप सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात आजही दमदार पावसाच्या प्रतिक्षेत जिल्हावासी आहेत. सुरुवाती पासूनच पावसाने खेळी केल्याने शेतीची कामे रखडली असतानाच आजही जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प तहानलेलेच दिसून येत आहेत. तसेच शेतकरीही चिंतेत आले आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्प आजही तहानलेलेच

By

Published : Aug 7, 2019, 3:15 PM IST

गोंदिया- राज्यात सर्वत्र पावसाचा प्रकोप सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात आजही दमदार पावसाच्या प्रतिक्षेत जिल्हावासी आहेत. सुरुवाती पासूनच पावसाने खेळी केल्याने शेतीची कामे रखडली असतानाच आजही जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प तहानलेलेच दिसून येत आहेत. तसेच शेतकरीही चिंतेत आले आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्पांत आजही मोजकाच पाणीसाठा असून दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जून महिन्यात पावसाने दगा दिला. त्यानंतर जुलै महिन्यात काही काळ पाऊस बरसला मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली. आता जेमतेम मागील आठ दिवसांपासून पाऊस परतून आला परंतु, संततधार रिमझीम पाऊसच बरसला आहे. या पावसामुळे शेतीची कामे पुन्हा सुरू झाली असून अडकून पडलेल्या रोवण्यांना (भात लावणी) वेग आला आहे. या पावसामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला आहे. मात्र, मागील ३ दिवस झाले पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यात पुन्हा कोरड्याची स्थिती निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत. तसेच शेतकरीही चिंतेत दिसत असल्याचे चित्र आहे.

गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्प आजही तहानलेलेच

रिमझिम बरसलेल्या पावसामुळे प्रकल्पांना पाहिजे तसा फायदा झालेला दिसून येत नाही. जिल्ह्याला वर्षभर पाण्याची सोय करून देणारे चार प्रकल्प आहेत. या प्रकल्पात आजही मोजकाच पाण़ीसाठा असून भर पावसाळ्यात हे प्रकल्प तहानलेलेच दिसून येत आहेत. जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात आजही फक्त ४६.५१ टक्के पाणीसाठा आहे. सिरपूर प्रकल्पात ३१.६६ टक्के, पुजारीटोला प्रकल्पात ५६.६० टक्के तर कालीसरार प्रकल्पात २७.९९ टक्के पाणीसाठा आहे. यावरून भर पावसाळ्यात या प्रकल्पांची अशी स्थिती असल्याने आणखी दमदार पावसाची गरज दिसून येत आहे.


येणारा काळ कठीण दिसत आहे. तसेच जिल्ह्यात पावसाने सुरूवाती पासूनच खेळी केल्याने शेतीची कामे अडकून पडली. परिणामी आजही कित्येक शेतकऱयांची रोवण्यांनी झालेली नसल्याचे दिसत आहे. याशिवाय कमी पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख चार प्रकल्पात पाहिजे त्या प्रमाणात पाणीसाठा नाही. या प्रकल्पात पुरेपूर पाणीसाठा असणे जिल्ह्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. कारण या प्रकल्पातूनच जिल्ह्याला उन्हाळ्यात पाणी पुरविले जाते. त्यामुळे हे प्रकल्प न भरल्यास येणारा काळ मात्र, कठीण जाणार यात शंका नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details