गोंदिया -सध्या सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. रुग्णालयाच्या वार्डातील खाटा संपल्याने चक्क जमिनीवर गाद्या टाकून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णांना दाखल करण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने आता महाविद्यालय व्यवस्थापनासमोर सुद्धा पेच निर्माण झाला आहे.
खाली गाद्या टाकून रुग्णांवर उपचार, गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार - गोंदिया खाटा अपुऱ्या
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून कोरोनाचा देखील प्रादुर्भाव असल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. येथील बाह्यरुग्ण तपासणी विभागात सध्या दररोज ६०० हून अधिक रुग्णांची तपासणी केली जात आहे. विविध आजाराच्या रुग्णांची संख्या सुद्धा वाढत आहे, तर काही खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील वार्डात जागा अपुरी पडत असल्याने खाली गाद्या टाकून रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा प्रकार समोर आले आहे.
गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन चार वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, अद्यापही इमारतीचे बांधकाम सुरू न झाल्याने या महाविद्यालयाचा कारभार केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाच्या इमारतीतून सुरू आहे. या दोन्ही रुग्णालयाची जागा अपुरी पडत असल्याने आता रुग्ण दाखल करण्याची समस्या निर्माण झाली आहे. रुग्णालयामध्ये नॉनकोविड रुग्णांना दाखल करण्यासाठी वार्ड क्रमांक पाच हा एकमेव वार्ड आहे. या वार्डातील खाटांची क्षमता केवळ ३५ आहे. जिल्हाभरातून येथे दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता ते फारच अपुरे आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून कोरोनाचा देखील प्रादुर्भाव असल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. येथील बाह्यरुग्ण तपासणी विभागात सध्या दररोज ६०० हून अधिक रुग्णांची तपासणी केली जात आहे. विविध आजाराच्या रुग्णांची संख्या सुद्धा वाढत आहे, तर काही खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील वार्डात जागा अपुरी पडत असल्याने खाली गाद्या टाकून रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा प्रकार समोर आले आहे. या संदर्भात महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक रूखमोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॅमऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे.