गोंदिया - पाकिस्तानने जर आपल्या कारवाया थांबविल्या नाहीत तर भारतातून जाणारे पाणी थांबविण्यात येईल, असा इशारा नितीन गडकरी यांनी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात आयोजित सभेदरम्यान दिला आहे. त्यांनी विरोधक प्रफुल्ल पटेल यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले शिक्षणाचा भोंगळ व्यवसाय खऱ्या अर्थाने कोणी तयार केला असले तर भंडारा-गोंदिया येथील माजी केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे.
..तर पाकिस्तानमध्ये वाहणारे पाणी थांबविण्यात येईल - नितीन गडकरी
७० हजार कोटीची विमाने प्रफुल्ल पटेल यांनी खरेदी केली. मात्र, शेतकरी व सिंचनाचा प्रश्न कधी सोडविला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा विकास घडवून आणला असेल तर भाजपने घडवून आणला असेही त्यांनी सभेदरम्यान बोलताना सांगितले.
..तर पाकिस्तानमध्ये वाहणारे पाणी थांबविण्यात येईल - नितीन गडकरी
गडकरी पुढे म्हणाले. की ७० हजार कोटीची विमाने प्रफुल्ल पटेल यांनी खरेदी केली. मात्र, शेतकरी व सिंचनाचा प्रश्न कधी सोडविला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा विकास घडवून आणला असेल तर भाजपने घडवून आणला असेही त्यांनी सभेदरम्यान बोलताना सांगितले. ते भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात उपस्थित होते.