महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियातील डॉक्टरचा 'अविष्कार' मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ठरणार 'वरदान' - pot for insulin

गोंदिया शहरातील नामांकित डॉक्टर देवाशिष चटर्जी यांनी कुंभाराच्या मदतीने मातीचे एक विशिष्ट भांडे तयार केले आहे. या मातीच्या मधल्या भागात वाडु आणि पाणी टाकून आतील भांड्यात इन्सुलिन इंजेक्शन ठेवल्यास भांड्यातील तापमान हे भर उन्हळ्यात देखील २४ डिग्री इतके असते.

गोंदियातील डॉक्टरचा 'अविष्कार' मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ठरणार 'वरदान'

By

Published : Jun 15, 2019, 2:53 PM IST

Updated : Jun 15, 2019, 3:25 PM IST

गोंदिया- मधुमेह आजाराने ग्रस्थ असलेल्या रुग्णांना रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी नियमित इन्सुलिन इंजेक्शन घ्यावे लागते. हे इंजेक्शन ठेवण्यासाठी फ्रिजची आवश्यकता असते. सर्वसामान्यांना हा खर्च परवडणारा नाही. ही निकड लक्षात घेऊन गोंदियातील डॉक्टर देवाशिष चटर्जी यांनी मातीपासून एक इन्सुलिन पॉट तयार केला आहे. या पॉटमध्ये इन्सुलिन इंजेक्शन ठेवल्यास एक ड्रॉप महिनाभर देखील राखून ठेवता येतो.

देशातच नव्हे संपूर्ण जगात मधुमेह (डायबेटिज) च्या रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बदललेली जीवनशैली आणि श्रम करण्याचे कमी होत चाललेले प्रमाण हे या मागील प्रमुख कारण आहे. आदिवासी बहुल आणि ग्रामीण भागातसुद्धा डायबेटिज रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. कुठलाही आजार हा गरीब किंवा श्रीमंत व्यक्तीला पाहून होत नाही. डायबेटिजचे प्रमाण अधिक असणाऱ्या रुगांना इन्सुलिन इंजेक्शन घ्यावे लागते. इन्सुलिन वावेल अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी फ्रिजची आवश्यक्यता असते. मात्र, ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तींना फ्रिज घेणे शक्य होत नाही.

गोंदियातील डॉक्टरचा 'अविष्कार' मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ठरणार 'वरदान'

गोंदिया शहरातील नामांकित डॉक्टर देवाशिष चटर्जी यांनी कुंभाराच्या मदतीने मातीचे एक विशिष्ट भांडे तयार केले आहे. या मातीच्या मधल्या भागात वाडु आणि पाणी टाकून आतील भांड्यात इन्सुलिन इंजेक्शन ठेवल्यास भांड्यातील तापमान हे भर उन्हळ्यात देखील २४ डिग्री इतके असते. त्यामुळे या भांड्यात इन्सुलिन इंजेक्शन महिनाभर देखील टिकून राहत आहे. मधुमेह आजाराने ग्रासलेल्या रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून, फक्त २०० रुपयात हा इन्सुलिन पॉट तयार होत आहे. ज्या रुग्णांना हे पॉट घेणे परवडत नाही, अशा रुग्णांना दिशा आरोग्य संस्थेमार्फत हे मोफत दिले जाते.

डॉ. चटर्जी हे गोंदिया शहरासोबत नक्षलग्रस्थ आदिवासी बहुल भागात देखील सेवा देत आहे. त्यांनी २० वर्षाआधी अतिदुर्गम दरेकसा गावात दिसा आरोग्य कुटी तयार केली आहे. या परिसरातील १५ गावांना दत्तक घेत फक्त ५ रुपयात ते रुग्णांना सेवा देतात. विशेष बाब म्हणजे २५ गावातील कुटुंबीयांची रेकॉर्ड देखील ते मेंटेन करत आहेत.

Last Updated : Jun 15, 2019, 3:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details