गोंदिया - देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळेअनेक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना नीटची परीक्षा कधी होणार. तसेच परीक्षा झाल्यास, ती कशी होणार याची चिंता आहे. मात्र, 'येत्या काळात कोरोनामुळे सुरू असलेला लॉकडाऊन संपेल. यानंतर नीटची परीक्षा ही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन नाही तर ऑफलाईनच होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अभ्यास करत रहावे' असे धोटे बंधू महाविद्यालयाचे प्राचार्य अंजन नायडू यांनी सांगितले आहे.
नीटची परीक्षा ऑनलाईन नाही तर ऑफलाईन होणार... प्राचार्य अंजन नायडू यांची माहिती हेही वाचा...लग्नाला लॉकडाऊनचं विघ्न, मग ऑनलाईन उरकला शुभविवाह
प्रश्वांचे स्वरुप सोपे असू शकते...
आगामी नीटच्या परीक्षेत साधारणतः 70 टक्के प्रश्न हे सोपे असू शकतात. तर 30 टक्के प्रश्नांची काठिण्यता पातळी जास्त असू शकेल, असेही प्राचार्य अंजन नायडू यांनी म्हटले आहे.
संपूर्ण देशात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू आहे. लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद असले तरिही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरूच आहे. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, विषय सहायक, समुपदेशक, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या माध्यमातून प्रत्येक शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हॉट्सअॅप ग्रुप बनवण्यात आले आहेत. या ग्रुपवर शिक्षकांकडून 'अभ्यासमाला' दररोज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.
हा ऑनलाईन अध्ययनाचा उपक्रम विद्यार्थ्यांच्या अतिशय आवडीचा ठरत आहे. पालकही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत आहे. शिक्षक आणि पालकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थी ऑनलाईन अध्ययन, गृहपाठ पूर्ण करत आहेत. अशाप्रकारे विद्यार्थी शाळा, महाविद्यालये बंद असले तरीही दररोज घरी राहुन अभ्यास करत आहेत.