गोंदिया- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासन आणि प्रशासनातर्फे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे आणि रोजगाराची साधने ठप्प पडली आहेत. परिणामी हातावर पोट असणाऱ्यांची गैरसोय होत आहे. अशा लोकांसाठी राष्ट्रवादीने पुढाकार घेतला आहे. गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचून त्यांना अन्नधान्याच्या किटचे वाटप केले जात आहे.
राष्ट्रवादीचा गरजूंना मोठा आधार, आतापर्यंत गोंदियात १५ हजार जणांना मदत - प्रफुल्ल पटेल
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने ३ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे उद्योग धंदे, रोजगार सर्व कामे ठप्प झाली आहेत. परिणामी यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांचा रोजगार हिरावला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांना रोजगार नसल्याने त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला आहे.
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. तसेच हातावर पोट असणाऱ्या मुजरांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. छोट्या-मोठ्या उद्योगांची संख्या काही प्रमाणात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने ३ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे उद्योग धंदे, रोजगार सर्व कामे ठप्प झाली आहेत. परिणामी यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांचा रोजगार हिरावला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांना रोजगार नसल्याने त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी स्वतःच्या माध्यमातून अन्नधान्य वाटप करण्यास सुरुवात केली आहे. तसेच प्रत्येक गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत ८ हजारावर गरजू कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. तसेच येत्या तीन ते चार दिवसात १५ हजार गरजू कुटुंबापर्यंत पोहोचून मदत करण्याचे नियोजन खासदार पटेल यांनी केले आहे.