गोंदिया -अभिनेत्री कंगणा रणौत हिने मुंबईत म्हणजे पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटत असल्याचे ट्विट केले. त्यानंतर तिच्यावर जोरदार टीका होत आहे. गृहमंत्री अनिल देखमुखांनंतर आता राष्ट्रवादी नेते खासदार प्रफुल पटेल यांनी देखील कंगणावर निशाणा साधत कंगणाबाई शुद्धीत नसल्याचे म्हटले आहे. प्रफुल पटेल गोंदियाच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांना पत्रकारांनी कंगणाबाबत प्रश्न विचारला होता.
कंगणाबाई शुद्धीत नाही, तिला सिरियसली घेऊ नका - प्रफुल पटेल - प्रफुल पटेल कंगणा रणौत टीका
कंगणाबाईला आपण का सिरीयसली घेतो आहोत? बाहेरून येऊन तिने मुंबईला आपले निवासस्थान केले. तरी येथे येऊन उलट - सुलट बोलत आहेत. मला वाटते ती बाई शुद्धीत नाही, असे विधान खासदार प्रफुल पटेल यांनी केले. प्रफुल पटेल गोंदियाच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांना पत्रकारांनी कंगणाबाबत प्रश्न विचारला होता.
कंगणाबाईला आपण का सिरीयसली घेतो आहोत? बाहेरून येऊन तिने मुंबईला आपले निवासस्थान केले. तरी येथे येऊन उलट - सुलट बोलत आहे. मला वाटते ती बाई शुद्धीत नाही, असे विधान खासदार प्रफुल पटेल यांनी केले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप कंगणाने केला होता. यानंतर सर्वत्र ट्विटर वॉर सुरू झाले. सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगणाच्या कानशिलात लावण्यासंबंधी ट्विट केले आणि वातावरण आणखी चिघळले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील कंगणाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे विधान केले आहे.
कंगणाने बॉलिवूडमधील ड्रग्ज लाइनबाबत माहिती असल्याचे सांगितले होते. तिची अमलीपदार्थ विरोधी पथकाची मदत करण्याची इच्छा आहे. मात्र, आपल्याला मुंबई पोलिसांची भीती वाटत आहे. हिमाचल प्रदेश पोलीस किंवा केंद्र सरकारकडून सुरक्षा मिळाल्यास आपण समोर येऊन माहिती देण्यास तयार आहोत, असे कंगणाने म्हटले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी 'सामना'मध्ये लिहिले होते की, मुंबईमध्ये राहत असूनही कंगणाचे मुंबई पोलिसांवर शंका घेणे निंदास्पद आहे. कंगणाने मुंबईत परत नाही आले तरी चालेल, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच गाजत आहे.