महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Naxalite Support ST Worker Strike : आता नक्षवाद्यांचाही एसटी कर्मचारी आंदोलनाला पाठिंबा; म्हणाले... - नक्षलवादी गोंदिया पोस्टर

नक्षलवाद्यांनी चक्क सालेकसा पोलीस ठाण्यापासून ( Naxalites Posters In Sarda Temple Area ) 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या शारदा मंदिरच्या परिसरात पत्रक लावले आहेत. 21 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Worker Strike ) सुरू आहे. परंतु, मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray ) या समस्यांकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे.

gondia
gondia

By

Published : Jan 25, 2022, 6:03 PM IST

गोंदिया - नक्षलवाद्यांनी चक्क सालेकसा पोलीस ठाण्यापासून ( Naxalites Posters In Sarda Temple Area ) 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या शारदा मंदिराच्या परिसरात पत्रक लावले आहेत. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड स्पेशल झोनल कमिटीच्यावतीने हे पत्रक काढण्यात आले असून अनंत नावाच्या झोनलच्या प्रवक्त्याची या पोस्टरवर सही आहे. 21 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Worker Strike ) सुरू आहे. परंतु, मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray ) या समस्यांकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे.

काय म्हटले आहे पत्रकात?

परिवहन मंत्री हा संप सोडविण्यासाठी एकीकडे बैठका घेतात, तर दुसरीकडे संप चिरडून टाकण्यासाठी प्रयत्न करतात. कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले जात आहे. लाठीचार्ज केले जात आहे. पगारात 41 टक्के वाढ, तसेच दर महिन्याच्या ८ तारखेला पगार देण्याचे आमिष दाखविण्यात येत आहे, असा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे. तसेच एसटीचे सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे, अशी मागणी नक्षलवाद्यांनी केली आहे. यासोबतच कोणताही राजकीय पक्ष या कर्मचाऱ्यांचे समर्थन करत नाही, याबद्दल दुःखही व्यक्त करण्यात आले आहे. जनतेने एसटी कर्मचाऱ्यांचे समर्थन करावे, असे आवाहनही या पत्रकातून करण्यात आले आहे.

हेही वाचा-BEST Bus : बेस्टच्या ताफ्यात येणार नवीन 900 दुमजली बस; टेंडरवरून भाजपचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details